मंद्रूप तहसील मधील सेतु केंद्राकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष; तीन वर्षाहून अधिक काळापासून सेतु केंद्राचे प्रतीक्षा.



अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप येथे चालू होऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटले तरी देखील आज पर्यंत मंद्रूप तहसील मधील नागरिकांना सेतू कार्यालयापासून वंचित राहावे लागत आहे.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील  अकोले (मंद्रूप), अंत्रोळी, औज (मंद्रूप), औराद, कुडल, कंदलगाव, कुसुर, कुरघोट, कारकल, खानापूर, गुंजेगाव, गावडेवाडी, चंद्रहाळ, चिंचपूर, टाकळी, तेलगाव, नांदणी, निंबर्गी, बंकलगी, बंदलगी, बरुर, बसवनगर, बाळगी, बिरनाळ, बोळकवठा, भंडारकवठे, मंद्रूप, मनगोळी, माळकवटे, येळेगाव, राजुर, लवगी, वडकबाळ, वडापूर, वांगी, विंचूर, शंकरनगर, संजवाड, सादेपूर, शिंदखेड, हत्तुर, हत्तरसंग,  होनमुर्गी या गावांना दक्षिण तहसील   मधून वगळून मंद्रूप येथे अप्पर तहसील  कार्यालय सुरवात करण्यात आले.  मंद्रूप  तहसील कार्यालय झाल्यापासून मंद्रूप तहसील अंतर्गत येणाऱ्या गावातील नगरिकाना दक्षिण तहसील सेतु मधून कोणतीच सेवा मिळत नाहीत. यामुळे गोर-गरीब नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच मंद्रूप तहसीलकार्यालय चालू होऊन तीन वर्षाहून अधिक झाली पण आज पर्यन्त मंद्रूप तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्राची सुरुवात करण्यात आली नसल्याने मंद्रूप तहसील अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.   सेतू कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, नॉन क्रिमीलेयर,  रहिवाशी दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, अल्पभूधारक दाखला, शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, असे भरपूर सेवा  सेतू कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना सहजरीत्या मिळवता येतात. आणि त्याच प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असा शुल्क देखील सेतू कार्यालयात द्यावे लागते. सेतु मध्ये उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला अशा दाखल्यांसाठी फक्त 34 रुपये 60 पैसे इतका शुल्क आकारण्यात येतो आणि जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रतिज्ञा पत्रासहित असल्यास 57 रुपये 20 पैसे इतका शुल्क आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिक  आणि विद्यार्थ्यांचा कल सेतू कार्यालयाकडे जास्त असतो. इतका सोय सेतू मूळे सर्वसामान्य नगरिकान होत असेल तर मंद्रूप तहसील मधील सेतू कार्यालय चालू करण्याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष का करत आहे असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.


तहसीलदार आणि नागरिकांचे प्रतिक्रिया  

 

भविष्यात  सेतू कार्यालय चालू झाल्यास त्यामधून उत्तम प्रकारचे सेवा अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप अंतर्गत देण्यात येतील. आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे.

                                                                   राजशेखर लिंबारे, 

                                                 तहसीलदार, अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप. 


……………………………………………………………………………………………………………..

मंद्रूप तहसील कार्यालय चालू होऊन बरेच दिवस झाले. बरेच वेळा तहसीदार यांना सेतु चालू करण्यासाठी तोंडी मागणी देखील केली आहे. पण अजून सेतु चालू झाले नाही. तरी लवकर सेतु चालू झाल्यास सर्वसामान्य नगरिकान त्याचा नक्कीच फायदा होईल. 

                                                         साहेबलाल चाँदबाशा हवालदार, 

                                                    शेतकरी, माळकवठे ता. दक्षिण सोलापूर. 

……………………………………………………………………………………………………………………

मंद्रुप तहसील कार्यालयात सेतु चालू झाल्यास विद्यार्थ्यांना व नागरिकांना कमी शुल्कात, कमीतकमी वेळेत दाखले व इतर सेवा मिळवता येतील. 

                                                                शशिकांत गुरुनाथ माळी, 

                                                      विद्यार्थी, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर. 

……………………………………………………………………………………………………………………

मंद्रूप हे आजू-बाजू च्या खेडे गावातील मध्यवर्ती ठिकाण आणि मोठा गाव असून तिथे इतर गावातील लोकांचे येणे-जाणे रोज असते. तिथे शाळा-कॉलेज आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी सारखे दाखल्याची गरज असते त्यामुळे मंद्रूप तहसील कार्यालयात सेतु केंद्र चालू झाल्यास सर्वानाच सोईचे होईल. 

                                                       मल्लिकार्जुन पंचप्पा बिराजदार, 

                                                शेतकरी, कारकल ता. दक्षिण सोलापूर.

Comments

Popular posts from this blog

मंद्रूप तहसील मध्ये मान्सून पूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन.